विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची राम सातपुते यांच्या श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट…

दोन राम श्रीराम बंगल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन माळशिरस तालुक्यात रयतेचे पुन्हा रामराज्य येण्याचे संकेत….
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला, मांडवे, ता. माळशिरस येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सभापती राम शिंदे यांचा सन्मान केलेला आहे. दोन राम श्रीराम बंगल्यावर एकत्र आल्याने माळशिरस तालुक्यात रयतेचे पुन्हा राज्य येणार असल्याचे संकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे श्रीराम बंगला येथे भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या न्यायाने सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी औक्षण केले. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक ॲड. भानुदास राऊत, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, भाजपा किसान मोर्चाचे राज्य सचिव व ज्येष्ठ नेते सोपानकाका नारनवर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बबनबापू पालवे, ज्येष्ठ नेते दादासाहेब पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष ॲड. शरदजी मदने, भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील, शशिकांत कल्याणी, राहुल पद्ममन, नागेशमालक वाघमोडे, रणजीत ठवरे, हनुमंत कर्चे, आनंद शेंडगे सर, अण्णासाहेब देवकाते, मदन सुळे, संजय देशमुख, देविदास उर्फ भैय्यासाहेब चांगण, अर्जुनराव देवकाते, विनोद काळे सर, अमित चांगण, किसन मामा सरगर, महादेव पवार, रावसाहेब रुपनवर, पिंटू धायगुडे, सोमनाथ मदने, पप्पू बुधावले, सचिन किर्दक, वैभव जानकर, ॲड. राहुल लवटे, पांडुरंग चोपडे, गजानन गोरे, तानाजीराव सूर्यवंशी, चैतन्य कोळेकर, भानुदास शिंदे, ज्ञानदेव तरंगे, देविदास काळे, रोहित कुलकर्णी आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दोन राम श्रीराम बंगल्यावर एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन माळशिरस तालुक्यात रयतेचे पुन्हा रामराज्य येणार असे संकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे सभापती यांनी माळशिरस तालुक्याचे पालकत्व घ्यावे, असे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी म्हणताच सभापती राम सातपुते यांनी हसत दाद दिली. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.