विद्यापीठ संगणकशास्त्र संकुल, क्लिक हिल फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रम
सोलापूर (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल व क्लिक हिल फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30/09/24 रोजी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील प्रविण कोळी व सिद्रामय्या स्वामी या विद्यार्थ्यांनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या विषयावर सेमिनार दिले. या सेमिनारमध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अश्या प्रकारच्या फसवणुकी होऊ नये, म्हणून सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबरवरून आलेल्या फोन कॉल्सची पडताळणी करून घेणे, whatsapp व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉग वापरून आपली माहिती सुरक्षीत करावी तसेच आपली माहिती हि आपली जबाबदारी आहे असे सांगितले.
मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा. या कार्यक्रमास एकूण १५० विद्यार्थी व केदार म्हमाणे सर, ए. बी. लिगाडे सर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागेश फुलारी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What is a good dental health? My website: prodentim reviews
exlkku