लहानग्या चंद्रगुप्तने, विहाळ जि.प. शाळेतील छोट्या मित्रांसोबत केला अनोखा वाढदिवस साजरा….

विहाळ (बारामती झटका)
वाढदिवस म्हटले कि, लहानापासुन-मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा विषय. असाच करमाळा नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रशालेत शिकणाऱ्या चंद्रगुप्त आणि सुर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस विहाळ येथील जि. प. प्राथमिक शाळेत वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांसोबत चंद्रगुप्त व सुर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे चंद्रगुप्त व सुर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस करमाळ्यातील त्यांच्याच शाळेत दरवर्षी विविध उपक्रमातुन साजरा केला जातो. परंतु त्यांचे आजोबा दशरथआण्णा कांबळे यांच्या सामाजिक कार्याच्या विचारातुन या वर्षीपासुन करमाळा तालुक्याच्या विविध गावांमध्ये, दरवर्षी चंद्रगुप्त व सुर्यपुत्र यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातुन साजरा करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे मा. संचालक तसेच शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे हे होते. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वीट केंद्राच्या केंद्रप्रमुख महाजन मॅडम, विहाळ ग्रामपंचायत सरपंच पुजाताई मारकड, उपसरपंच आश्विनीताई चोपडे, रिपाई (आ.) जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गाडे, संजय चोपडे सर, वृक्षमित्र काका काकडे, शिलराज कांबळे, मल्हारी मारकड, शिवाजी चांदणे, नामदेव किसवे, मोहन मारकड, माधव जाधव, पंढरीनाथ गाडे सर, दशरथ बंडगर आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सतीश कांबळे सर, सहशिक्षिका वैष्णवी आव्हाड मॅडम, अंगणवाडी शिक्षिका करे मॅडम आणि मदतनीस मनीषा मारकड यांनी सहकार्य केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.