ताज्या बातम्यासामाजिक

विजयवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. स्मिता संजय लावंड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, विजयनगर विजयवाडी सभापती श्री. संजय भाऊराव लावंड यांना पत्नीवियोग..

विजयवाडी (बारामती झटका)

विजयवाडी, ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. स्मिता संजय लावंड यांचे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रुग्णालयात दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, दीर, जावा, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय विजयनगर विजयवाडी या विद्यालयाचे सभापती श्री. संजय भाऊराव लावंड यांच्या धर्मपत्नी होत्या. तर ॲड. लखन संजय लावंड यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर विजयवाडी येथील राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये रात्री नऊ वाजता शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे.

यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.

स्वर्गीय सौ. स्मिता लावंड उर्फ आन्टी यांच्या आत्म्यास शांती लाभो व लावंड परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button