ताज्या बातम्याराजकारण

विजयसिंह मोहिते पाटील पुरस्कृत कण्हेरसिद्ध ग्रामविकास पॅनेल, कण्हेर च्या प्रचाराचा शुभारंभ झाला.


युवा नेते धर्मराज वसंत माने व समस्त ग्रामस्थ यांच्या समवेत सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार यांच्या उपस्थितीत संपन्न

कण्हेर (बारामती झटका)

कण्हेर ग्रामपंचायत निवडणूक 2023 निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याचे संपून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आलेले आहे. विजयसिंह मोहिते पाटील पुरस्कृत कन्हेरसिद्ध ग्रामविकास पॅनल कण्हेर या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दि. 27/10/2023 रोजी सायंकाळी 05 वाजून 30 मिनिटे या शुभमुहूर्तावर ग्रामदैवत मारुती मंदिर व गावातील देवी देवतांना श्रीफळ वाढवून श्री. धर्मराज वसंत माने व पॅनलमधील सर्व ज्येष्ठ मंडळी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कण्हेर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार माने सोनल दत्तात्रय, वार्ड क्र. 01 काळे तेजस्विनी सुनील, बर्वे शंकर रामचंद्र, शिंदे पुनम महादेव, वार्ड क्र. 02 माने सायली प्रशांत, काळे मारुती भगवान, माने संभाजी रामचंद्र, वार्ड क्र. 03 पाटील दत्तात्रय प्रकाश, माने दिपाली महादेव, वार्ड क्र. 04 माने कल्याण साधू, वाघमोडे संगीता हनुमंत, वार्ड क्र. 05 केंगार शितल सोमनाथ, माने उज्वला अनिल, बोडरे रुक्मिणी विष्णू असे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. माने सोनल दत्तात्रय यांचे चिन्ह शिट्टी तर उर्वरित ग्रामपंचायत सदस्यांना बॅट, ट्रॅक्टर, गॅस सिलेंडर अशी चिन्हे आहेत.

ग्रामपंचायत सत्ता अबाधित ठेवण्यासाठी पॅनलमधील सर्व ज्येष्ठ मंडळी व ग्रामस्थ मतदार यांनी सर्वांनी एकत्र येऊन पॅनल तयार केलेला आहे. सर्वांची एकजूट करून विजय संपादन करण्याचा निर्धार केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button