विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलातील सयाजीराजे पार्कची जाहिरात कायदेशीर की बेकायदेशीर….
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल ग्राउंडमध्ये सयाजीराजे पार्क च्या जाहिरातीसाठी परवानगी घेतली आहे का, उलटसुलट चर्चा…
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे खाजगी व्यक्तींना जाहिरात अथवा अभिनंदनचे फलक लावण्यास प्रतिबंधात्मक मनाई आहे. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलातील बास्केटबॉल ग्राउंडमध्ये सयाजीराजे पार्कची जाहिरात लावण्यासाठी परवानगी घेतली आहे का ?, अशी उलट सुलटचर्चा सुरू आहे.
क्रीडा संकुलातील सयाजीराजे पार्कची जाहिरात अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांची कायदेशीर परवानगी घेऊन लावलेली आहे का ?, का बेकायदेशीर लावलेली आहे ?. बेकायदेशीर असेल तर सयाजीराजे पार्कवर कारवाई करणार का ?, असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून येत आहे.
अकलूज नगरपरिषद हद्दीमध्ये शासनाने क्रीडा संकुलसाठी शासकीय निधी मंजूर केलेला होता. सदरच्या क्रीडा संकुलाचे टेंडर एक कोटी ३५ लाखाचे होते मात्र, ठेकेदार यांनी शासनाची फसवणूक करून 50 लाखाचे रजिस्ट्रेशन असताना एक कोटी 50 लाखाचे बनावट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणून सदरच्या क्रीडा संकुलाचे बेकायदेशीर कागदपत्राच्या आधारे बनावट ठेकेदाराने काम केलेले आहे.
ठेकेदाराच्याआडून बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती. सदरचे काम अंदाज पत्रकानुसार झालेले नसून क्रीडा संकुलाचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. संरक्षक भिंती सुद्धा कोसळत आहेत. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या झालेल्या कामाची सुद्धा चौकशी व्हावी व सयाजीराजे पार्कची जाहिरात बेकायदेशीर असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांनी करावी, अशी अकलूजकरांची इच्छा आहे. यासाठी लवकरच सामाजिक कार्यकर्ते आंदोलन, उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.