ताज्या बातम्याराजकारण

विक्रम पराडे पाटील व सौ. ऋतुजा विक्रम पराडे पाटील यांनी 2000 सभासद नोंदणीचा विक्रम केला…

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला पत्र व्हायरल करण्याची गरज नाही, गद्दारांना पत्रातून निष्ठा दाखवण्याची दुर्दैवी वेळ….

बाभुळगाव (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना भाजपा सदस्यता अभियान सुरू करताना कार्यकर्त्यांना 71 हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगितलेले होते. त्याप्रमाणे माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात प्रस्थापितांचा कर्दनकाळ असणारे स्वर्गीय रविराज पराडे पाटील उर्फ रवीकाका यांचे चिरंजीव युवा नेते विक्रम रविराज पराडे पाटील उर्फ सोनूभैय्या व सुनबाई सौ. ऋतुजाताई विक्रम पराडे पाटील या उभय दांपत्यांनी 2000 सदस्य नोंदणीचा विक्रम केला आहे.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला पत्र व्हायरल करण्याची गरज नाही. वरून किर्तन आतून तमाशा असे करणाऱ्या गद्दारांना पत्रातून पक्षनिष्ठा दाखविण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माळशिरस तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

पावसाळ्यात अचानक उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे गद्दार नेते व कार्यकर्ते सदस्यता अभियानात सहभागी झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियानात भाजपचे निष्ठावान सदस्य झालेले आहेत का ? आपल्यासारख्या गद्दारांची सदस्यांमध्ये नोंदणी केलेली आहे, याची पोलखोल लवकरच केली जाईल, अशी निष्ठावान भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button