वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे वीरशैव लिंगायत समाज संघटना सदाशिवनगर यांच्यातर्फे महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवार दि. ३०/४/२०२५ रोजी श्री दत्त मंदिर (कॉर्पोरेशन), ता. माळशिरस येथे साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ सदाशिवनगर यांचे दुपारी ४ ते ६ या वेळेत भजन, तर सायंकाळी ६ वाजता प्रतिमा पूजन व आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन साईराज सुज्ञे अध्यक्ष, महात्मा बसवेश्वर जयंती समारंभ समिती, सागर उरवणे अध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज संघटना सदाशिवनगर, जगदीश राजमाने उपाध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज संघटना सदाशिवनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.