विठ्ठलवाडीचे विठ्ठल गुंड यांचे निधन
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-06-at-2.13.17-PM-454x470.jpeg)
माढा (बारामती झटका)
विठ्ठलवाडी, ता.माढा येथील रहिवासी व सध्या पुणे येथील शाहू मंदिर कॉलेजमध्ये कार्यरत असलेले विठ्ठल मगन गुंड (वय ५७) यांचे बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात, आई, वडील, दोन चुलते, पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, एक मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. ते विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व माजी ग्रामपंचायत सदस्य भिमराव गुंड यांचे पुतणे, पुणे येथील जॉन डिअर कंपनीत कार्यरत इंजिनियर विनोद गुंड यांचे वडील, माध्यमिक शिक्षक नारायण गुंड यांचे बंधू , प्रा. छगन गुंड, प्रा. कुंडलिक गुंड, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, प्राथमिक शिक्षक गणेश गुंड, विठ्ठलराव शिंदे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड व प्राथमिक शिक्षक दिनेश गुंड यांचे चुलत भाऊ होत. त्यांच्या अकाली निधनाने विठ्ठलवाडी गावात शोककळा पसरली असून सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत. समस्त गुंड परिवार, मित्रमंडळी व नातेवाईक यांच्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीत गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. विठ्ठल गुंड यांच्या अकाली निधनाने गुंड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर गुंड परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व कै. विठ्ठल गुंड यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.