ताज्या बातम्याशैक्षणिक

विठ्ठलवाडीचे दोन वर्गमित्र विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड होणार डॉक्टर

दोघांनाही एकाच मेडिकल कॉलेजमध्ये मिळाला प्रवेश; आर्या स्कूलचे एकाच वर्गातील माजी विद्यार्थी

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील निमगाव (टें.) येथील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या स्कूलमधील एकाच वर्गात शिकलेले विघ्नेश भास्कर गव्हाणे व राजवर्धन राजेंद्रकुमार गुंड हे दोन माजी विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर डॉक्टर होणार आहेत. ते दोघेही शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचे आहेत. विशेष म्हणजे या दोघांनाही एकाच वेळी एकाच मेडिकल कॉलेजमध्ये सोलापूर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल आणि गावाचा नावलौकिक उंचाविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

विघ्नेश गव्हाणे याने वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत 720 पैकी 620 गुण तर राजवर्धन गुंड याने 720 पैकी 618 गुण प्राप्त केले आहेत. विशेष म्हणजे नीट परीक्षेसाठी मायनस गुण पद्धती आहे. त्यामुळे या दोन्ही गुणी व अभ्यासू विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे उज्ज्वल यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या दोघांनाही मेडिकल प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सोलापूर येथील अश्विनी मेडिकल कॉलेज, कुंभारी येथे प्रवेश मिळाला आहे. या दोघांचेही 10 वी पर्यंतचे शिक्षण माढा येथील आर्या पब्लिक स्कूलमध्ये झाले असून दोघांनीही नीट परीक्षेच्या तयारीसाठी लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये शिकवणी वर्ग लावले होते. विघ्नेशचे वडील भास्कर गव्हाणे हे म्हैसगाव येथील खासगी साखर कारखान्यात अकौंटंट विभागात कार्यरत आहेत तर राजवर्धनचे वडील राजेंद्रकुमार गुंड हे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे दोघांचे वडीलही वर्गमित्रच आहेत.

या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत, संचालक गणेश काशीद, डॉ. एकनाथ शेळके, डॉ. विनोद शहा, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, डॉ. सुभाष पाटील, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, लेखक डॉ. किशोर गव्हाणे, चेअरमन अनिलकुमार अनभुले, प्रा. हनुमंत कदम, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, डॉ. मोहन शेगर, प्रा. नेताजी कोकाटे, डॉ. संतोष कदम, अनिलकुमार बरकडे, हनुमंत उबाळे, रामचंद्र भांगे, मारुती शेंडगे, संजय जाधव, तानाजी जाधव, विजय गव्हाणे, सुहास शिंगाडे, राजाभाऊ कदम, सौदागर गव्हाणे, नेताजी उबाळे, महावीर बरकडे, शिवाजी कदम, अंकुश डूचाळ, शंकर जाधव, विष्णू शेंडगे, सोमनाथ खरात, कैलास सस्ते, सतीश गुंड, सज्जन मुळे, ब्रम्हदेव शिंगाडे, महादेव बरकडे, दयानंद शेंडगे, सौदागर खरात, भिवाजी जाधव, दिनकर कदम, ज्ञानेश्वर शेंडगे, अशोक कदम, अशोक जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button