विठ्ठलवाडीचे राजेंद्र गुंड जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टें.) या संस्थेत मागील २३ वर्षांपासून कार्यरत असणारे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन – २०२४ च्या जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व फेटा देऊन रविवार दि. ८ डिसेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड कॉलेजमध्ये समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांचे सुपुत्र राजेंद्रकुमार गुंड यांनी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी दहावीच्या पुणे बोर्डाच्या परीक्षेत चमकले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात शालेय व सहशालेय उपक्रम राबविले आहेत. विविध खाजगी व शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी ते विद्यार्थ्यांकडून करुन घेतात. एक विद्यार्थीप्रिय हाडाचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
यावेळी संस्थापक अमोल सुरवसे, कृती समितीचे समाधान घाडगे, डॉ. यू. एफ. जानराव, शशिकला जगताप, नंदकुमार टोणपे, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, पूजा सुरवसे, संगीता देवकर, मेघना गुंड, महावीर आखाडे, सुधीर गुंड, रामचंद्र काटकर, अपूर्व सावंत, प्राचार्य सागर थोरात, हरिश्चंद्र इंगळे, रमेश जाधव, मुख्याध्यापक मारुती ढगे, शंकर धावारे, गजानन जोकार, बंडू जाधव, गजानन लावर, हरिश्चंद्र गाडेकर, समाधान दुधाळ, राजेंद्र आसबे, आगतराव भोसले, प्रियंका शिंदे, ज्ञानेश्वर मस्के, नरसेश्वर पाटील, विनोद काळे, उल्हास सोनार, राजाराम देवकर, तुकाराम भाकरे, मारुती शिंदे, मेघश्री गुंड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Поиск в гугле