ताज्या बातम्यासामाजिक

एकता गणेश उत्सव मंडळाचा आदर्श समाजातील इतर मंडळांनी घ्यावा असा आहे….

सामाजिक उपक्रम राबविले जाताना समाजाचे हित पाहिले जाते मात्र, समाजाला आर्थिक झळ दिली जात नाही…

खुडूस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील एक गाव एक गणपती या उपक्रमामध्ये एकता गणेश उत्सव मंडळाचा आदर्श समाजातील इतर मंडळांनी घ्यावा असा आहे. मंडळाची स्थापना तीस वर्षांपूर्वी झालेली आहे. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक उपक्रम राबवित असताना समाजाचे हित पाहिले जाते मात्र, समाजाला आर्थिक झळ मंडळातील सदस्यांकडून दिली जात नाही.

एकता गणेश उत्सव मंडळाची स्थापना सर्व जाती धर्मातील 30-35 तरुणांनी एकत्र येऊन केलेली आहे. सामाजिक उपक्रम अथवा गणेश उत्सवामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत असताना समाजामध्ये वर्गणी अथवा देणगी मागितली जात नाही. मंडळातील सदस्य स्वतः खर्च करीत असतात.

एकता गणेश उत्सव मंडळाने गणपतीचे भव्य दिव्य मंदिर उभा करून शिखर उभारलेले आहे. सदरच्या मंदिरासाठी गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने देणगी दिलेली आहे. मंदिराच्या समोर माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी आमदार फंड दिलेला होता त्या आमदार फंडातून मंदिरासमोर सभा मंडप बांधलेले आहे. गणेश उत्सव मूर्तीची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा केली जाते. गणपती उत्सव, गणेश जयंती व इतर वेळी गणपती मंडळ समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असतात. मंडळातील सर्व सदस्य एकत्र येऊन काम करीत असतात.

गेल्या तीस वर्षापासून खुडूस गावचे माजी सरपंच रामचंद्र मुरलीधर चौगुले उर्फ रामनाना अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळीत आहेत. गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये समाज प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील मुले, मुली व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविले जात आहेत. गणेशोत्सवामध्ये सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे समजून मंडळात कोणत्याही प्रकारे भेटवस्तू न देता स्वयंस्फूर्तीने 48 लोकांनी रक्तदान केलेले आहे. त्यामध्ये गोविंद नामदेव बनकर, अमोल संदिपान चौगुले, ज्ञानदेव महादेव शिंदे, डॉक्टर चेतन ज्योतीराम शिंदे, आकाश बाळासो बनकर, जयदीप सतीश बनकर, सौरभ पोपट बनकर, गजानन संजय माळी, दीपक वसंत भुजबळ, मयूर विठ्ठल हिंगमिरे, आसिफ अकबर शेख, सागर रमेश भिसे, संपत्ती श्रीमंत काळे, अश्विनी सतीश देशपांडे, मच्छिंद्र प्रकाश बनकर, वृषाली रावसाहेब थोरात, रावसाहेब बबन थोरात, माधुरी शिवाजी थोरात, हनुमंत मुरलीधर चौगुले, किरण रामचंद्र वाघ, समाधान श्रीमंत शिंदे, बालाजी अशोकराव गीते, प्रवीण उत्तम आडत, तौसीफ रसूल तीकोटे, ज्ञानदेव आप्पा लोखंडे, रामचंद्र मुरलीधर चौगुले, उमेश बाळासो शिंदे, अजीम दिलावर शेख, शुभम प्रदीप कांबळे, राजेंद्र जनार्धन पवार, तुकाराम विठोबा वळकुंदे, महादेव देविदास ठवरे, पोपट भीमराव बनकर, किशोर सुरेश वेदपाठक, अनिल रामचंद्र कांबळे, योगेश आनंदराव ठवरे पाटील, दिनेश सुनील बनकर, रणजीत सदाशिव झंजे, नामदेव अण्णा ठवरे, अविनाश भागवत ठवरे, महादेव गणपत पुकळे, ऋषिकेश देविदास सुरवसे, गणेश सतीश गैंड, धनंजय दत्तात्रेय जोशी, आनंदा नामदेव सलगर, विशाल भाऊ पाटोळे, सुरज सुग्रीव खरात, सुरज गंगाधर वाघ, अशा 48 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलेले आहे. सदरचे रक्तदान अक्षय ब्लड बँक सोलापूर यांच्या सहकार्याने झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort