ताज्या बातम्याशैक्षणिक

विठ्ठलवाडीच्या दोघांचा एकाचवेळी मेडिकलला प्रवेश ही बाब कौतुकास्पद – अध्यक्ष रामचंद्र भांगे

दोन वर्गमित्र विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड यांचा सत्कार

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड या दोन वर्गमित्रांना एकाच वेळी सोलापूरच्या अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळाला आहे. ही बाब खरोखरच विशेष उल्लेखनीय असून ती निश्चितच कौतुकास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता. माढा येथे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड यांचा ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या हस्ते सत्कार करताना बोलत होते.

यावेळी बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिक कष्ट, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व अचूक मार्गदर्शनाची गरज असते. हेच नेमके या दोघांच्या बाबतीत घडले आहे. या दोघांनी कुटुंबाचा व विठ्ठलवाडी गावाचा नावलौकिक उंचावला आहे. यापुढेही हा उज्ज्वल यशाचा आलेख चढता ठेवण्यासाठी दोघांनीही सतत प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले.

यावेळी राजवर्धन गुंड व विघ्नेश गव्हाणे यांनी सांगितले की, आमच्या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक, पालक व मित्रमंडळींचा मोठा वाटा आहे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल जो ठिकठिकाणचे सुज्ञ व जागरूक लोक, मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडून जे सत्कार व भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहोत. भविष्यात हे यश टिकवून ठेवण्याची आमची जबाबदारी आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड, सत्यवान थोरात, सुरेखा थोरात, सचिव सुशेन भांगे, सौदागर गव्हाणे, नेताजी उबाळे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, चिफ अकौंटंट भास्कर गव्हाणे, संदीप काशीद, सुधीर गुंड, मोहन भांगे, सुप्रिया ताकभाते, मेघना गुंड, रेश्मा गव्हाणे, माधुरी गुंड, सुजाता भांगे, सुवर्णा भांगे, शांता भांगे, महेश भांगे, दत्तात्रय काशीद, शिवम गुंड, सक्षम भांगे, मेघश्री गुंड, सई गव्हाणे, समृद्धी गुंड, शशांक काशीद यांच्यासह ग्रामस्थ, मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button