विझोरी गावचे माजी सरपंच स्वर्गीय पोपटराव काळे यांच्या स्मृती काळे परिवार यांनी अनोख्या पद्धतीने जपल्या..
विझोरी गावचे माजी सरपंच पोपटराव काळे अनंतात विलीन.
विझोरी (बारामती झटका)
विझोरी ता. माळशिरस, गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पोपटराव काळे यांचे मंगळवार दि. 19/11/2024 रोजी अपघाती दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर विझोरी-यशवंतनगर रोडवरील राहत्या घराशेजारी शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. त्यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मंडळी, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवार दि. 21/11/2024 रोजी सकाळी साडेसात वाजता रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काळे परिवार यांनी स्वर्गीय पोपटराव काळे यांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जपून पर्यावरण संतुलन साधलेले आहे. त्यांच्या स्मृती वृक्षारोपणाच्या स्वरूपात जतन करण्यात आल्या. यावेळी उत्तमराव जानकर, मच्छिंद्रआबा ठवरे पाटील, माणिकबापू मिसाळ, तुकाराम भाऊ देशमुख, भीमराव काळे, आप्पासाहेब काळे, अण्णासाहेब शिंदे, पांडुरंग वाघमोडे, सुरेशआबा वाघमोडे, भगवानराव राचकर, के. पी. काळे पाटील, अजित भैया बोरकर, डॉ. सचिन शेंडगे, आप्पासाहेब वाघंबरे, बाळासाहेब काळे आदी मान्यवरांसह आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी विझोरी पंचक्रोशीसह माळशिरस तालुक्यातील नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. पोपटराव काळे यांना श्रीनिवास कदम पाटील, मच्छिंद्रआबा ठवरे पाटील, उत्तमराव जानकर यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये तिसऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.