विझोरी येथे शाश्वत शेती दिवस साजरा

हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजन
विझोरी (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषीकन्या वैभवी ढेंबरे, वैष्णवी शिंदे, प्रणोती कोरे, शिवानी पावले, ऋतुपर्णा सावंत, प्रिती फडतरे, अमृता बांदल, तेजश्री शिंदे यांच्याकडुन विझोरी येथे भारतरत्न डॉ एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषीकन्यांनी शाश्वत शेती म्हणजे काय ?, त्याचे फायदे आणि त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
शाश्वत शेती म्हणजे जमिनीची, पिकांची, वनांची, पशुधनाची, वन्यजीवांची आणि पर्यावरणाची प्रतवारी न घसरता, त्यांचे संतुलित व्यवस्थापन करुन, वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अन्न, वस्त्र, आणि निवारा यांचा पुरवठा करणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्याऐवजी नैसर्गिक खते आणि किटकनाशके वापरणे, जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करणे, पिकांची फेरपालट करणे आणि विविध पिके घेणे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

पर्यावरणाची काळजी घेतली जाते. ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, शेती अधिक टिकाऊ होते. यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विझोरीचे सरपंच नामदेव काळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्राचार्य एस. एम. एकतपुरे, (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), प्रा. एच. एस. खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



