वूशू स्पर्धेत माळशिरस चा शार्दुल रविराज वाणी राज्यात तृतीय…

माळशिरस (बारामती झटका)
विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलमधील शार्दूल रविराज वाणी याने वूशू स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला.
सेलू (जि. परभणी) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय वूशू स्पर्धेत शार्दुलने सब ज्युनिअर स्पर्धेमध्ये ६० किलो वजनी गटामध्ये हे यश मिळविले. स्पर्धा वूशू असोसिएशन महाराष्ट्र राज्य व वूशू असोसिएशन जिल्हा परभणी यांनी आयोजित केली होती. शार्दूल हा विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे.
त्याच्या या यशाबद्दल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या इनामदार, श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अॅड. माधव मिरासदार, कार्याध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी, कार्यवाह रामभाऊ दोशी, सहकार्यवाह राजाराम ढाले यांच्यासह संचालक मंडळ व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. यशस्वी खेळाडूला क्रीडाशिक्षक संजय सपताळे यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.