ताज्या बातम्यासामाजिक
वाघोली येथील भारत पाटोळे यांचे दुःखद निधन…

वाघोली (बारामती झटका)
वाघोली ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. छायादेवी भारत पाटोळे यांचे पती श्री. भारत बलभीम पाटोळे यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी दि. २० मार्च रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात वयोवृद्ध वडील, पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी व नातू असा परिवार असून त्यांच्या दुःखद निधनाने वाघोलीतील ग्रामस्थांवर शोककळा पसरली.
श्री. भारत पाटोळे यांच्या दुःखद निधनाने पाटोळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर पाटोळे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व कै. भारत पाटोळे यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.