व..हा..रेअअअअ..वा लोकप्रतिनिधी, स्वतःच्या बुडाखालील अंधार ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा पहायचा वाकून – एक माळशिरसकर
माळशिरस नगरपंचायतीची चौकशी लावणाऱ्यांच्या अकलूज नगर परिषदमध्ये अँटिकरप्शनच्या जाळ्यात कर्मचारी सापडला; झाली की स्वतःचीच पंचाईत…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप केले जात होते मात्र, माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुकीची पात्रता घसरलेली होती. निवडणुकीत विकासाचे मुद्दे किंवा भविष्यामध्ये काय व्हिजन असणार याकडे दुर्लक्ष करून माळशिरस येथील जाहीर बैठकीत माळशिरस नगरपंचायतीची महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर झालेल्या कामकाजाची चौकशी लावणार, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींनी केलेले होते. माळशिरस नगरपंचायतीची चौकशी राहिली बाजूला, अकलूज नगर परिषदेमध्ये अँटी करप्शनच्या जाळ्यात कर्मचारी सापडला. त्यामुळे झाली की पंचाईत स्वतःचीच, अशी अवस्था निर्माण झालेली असल्याने वा…ह… रेअअअ… वा.. लोकप्रतिनिधी, स्वतःच्या बुडाखाली अंधार ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचचा पहायचा वाकून, अशी माळशिरसकरामध्ये चर्चा सुरू आहे.
अकलूज नगरपरिषदेची अद्याप निवडणूक झालेली नाही मात्र, सदर नगर परिषदेवर कोणाचा अधिकार व हक्क आहे, महाराष्ट्रालाच नव्हे तर आशिया खंडात सुप्रसिद्ध असणाऱ्या ग्रामपंचायतीने सर्वश्रुत करून दिलेले आहे. कोट्यावधी रुपयाचा निधीतून नगरपंचायतीच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. सदरची कामे ठेकेदार कोण, अधिकारी कोण याची सर्व इत्यंभूत माहिती लोकप्रतिनिधींना असतेइथांभूत. त्यामुळे नगर परिषदेमधील व्यवहार सुद्धा सहमतीने असले पाहिजेत, असाही माळशिरसकरांनी आरोप केलेला आहे. कर्मचारी सापडला तरी भ्रष्ट कारभार चालविणारा त्याचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे माळशिरस नगरपंचायत हद्दीत खुमासदार चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hi, Neat post. There iss a problem together with your website inn intternet explorer,
woulod est this? IE still is the market leaader
and a large element off folks wjll ledave outt yourr wonderful writing
ddue too this problem.