शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने रेशन कार्ड ऑनलाइन शिबिर संपन्न….

दहिगाव (बारामती झटका)
दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, रेशन कार्ड ऑनलाइन करण्यापासून वंचित असणाऱ्या घटकांना शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. ऋतुजाताई मोरे यांच्या संकल्पनेतून शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून रेशन कार्ड ऑनलाइन करण्याचे शिबिर घेण्यात आले. यावेळी दहिगाव जिल्हा परिषद गटातील लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. अनेकांना रेशन कार्ड ऑनलाइन करून देण्यात आले.

सदर ऑनलाईन केलेल्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई शरद मोरे यांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते वैभवराजे मोरे, गणेश टेंबरे, धनाजी खूपसे, विजय सरवदे, रोहन कोरटकर आदी उपस्थित होते.
सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आपल्या दैनंदिन कामामुळे रेशन कार्ड ऑनलाइन करणे राहून गेलेले होते. अनेकांना कशा पद्धतीने रेशन कार्ड ऑनलाइन करण्याची माहिती नसते, त्यामुळे ते रेशनच्या धान्यांपासून वंचित राहिलेले असतात. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या हिताचा निर्णय सौ. ऋतुजाताई मोरे यांच्या संकल्पनेतून शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला असून रेशन कार्ड ऑनलाइन शिबिरासाठी जनतेचा उदंड प्रतिसाद मिळालेला असून सर्वसामान्य व गोरगरिब लाभार्थ्यांना ऑनलाइनमुळे फायदा होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



