व्हॉट्सअप वरील नवीन पाहुणा…
बारामती झटका
गेल्या काही दिवसांपासून व्हाटसअॅपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा पाहिला असेल. बहुतेक लोकांना निळ्या जांभळ्या रंगाची ती रिंग म्हणजे कुठलं तरी नकळतपणे इनस्टॉल झालेले अॅप वाटले. काही जणांनी तर ते अनइन्स्टॉल करण्याचाही प्रयत्न केला असेल. परंतु ते अजिबात अनइन्स्टॉल होणार नाही. कारण हे कोणतेही नवीन अॅप नसून मेटा एआय नामक व्हाटसअॅपचेच सर्वात लेटेस्ट फीचर आहे.
मेटा किंवा फेसबुकने परवाच भारतातील फेसबुक, व्हाटसअॅप आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी मेटा एआय लाँच केले आहे. ज्यांना अजुनही मेटा एआय दिसत नसेल त्यांनी आपली अॅप्स लेटेस्ट व्हर्जनवर इनस्टॉल करणे आवश्यक असेल. तर मेटा एआय हा नेमका काय प्रकार आहे? ज्यांना चॅटजीपीटी किंवा गुगल जेमिनी ठाउक आहे त्यांना जनरेटीव एआय असिस्टंट माहित असेल.
मेटा एआय हा तसाच जनरेटीव्ह रिस्पॉन्स असून तो युजर्सना फेसबुक, व्हाटसअॅप किंवा इन्स्टाग्राम वापरत असताना अॅपमधून बाहेर न जाताच हवी ती माहिती पाहिजे त्या स्वरुपात मिळवणे, प्लॅनिंग, सल्ला, सजेशन, शिफारशी, काल्पनिक इमेजिस तयार करणे आदी असंख्य कामे काही सेकंदात पूर्ण करतो.
मेटा एआय साठी नवीनतम लियामा 3 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. व्हाटसअॅपवर मेटा एआय वापरायचे असेल तर त्या निळ्या जांभळ्या रिंगवर टॅप केल्यानंतर एका नवीन चॅट बॉक्समध्ये डायव्हर्ट केले जाते आणि त्याच ठिकाणी आपला माहितीपूर्ण संवाद सुरु होतो. त्यामुळे आता कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही. मेटा एआयचे सर्वात लोकप्रिय ठरु शकणारे फीचर म्हणजे इमॅजिन ज्याचा वापर करुन युजर ए आय जनरेटेड प्रतिमा तयार करुन त्या इतर व्हाटसअॅप युजर्सशी शेअरही करु शकेल.
या फीचरमुळे मेटा एआयचे चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनीपुढे खूप आव्हान उभे राहू शकते, ज्यांचे इमेज जनरेशन अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. याचा वापर करण्यासाठी मेटा एआयच्या चॅट बॉक्समध्ये फक्त इमॅजिन हा शब्द टाईप किंवा उच्चारुन इमेज प्रॉम्प्ट द्यावे लागतील.
अर्थात सध्या तरी भारतात मेटा एआय फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध असून लवकरच ते चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनीप्रमाणे भारतीय भाषांमध्येही वापरता येईल.
व्हिडिओ कॉलनंतर मेटा एआय हे फीचर व्हाटसअॅपच्या इव्होल्यूशनमधील एक माईलस्टोन असून तो युजर्ससाठी अमर्याद शक्यता घेवून आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Your expertise shines through in every post. Thanks for sharing your knowledge with us!
fortect license key reddit