ताज्या बातम्या

शिवतेजसिंह मोहिते पाटील कोण ?, असा प्रश्न माढा तालुक्यातील जनतेलाच पडलेला प्रश्न आहे, उलट सुलट चर्चेला उधाण…..

माढा (बारामती झटका)

शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील उर्फ शिवबाबा यांनी माढा तालुक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करून बाधित असणाऱ्या लोकांना शासकीय मदत मिळावी, अशा पद्धतीने सोशल मीडियावर समर्थकांनी पोस्ट व बातम्या व्हायरल केल्यानंतर शिवतेजसिंह मोहिते पाटील कोण ?, असा प्रश्न माढा तालुक्यातील जनतेलाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चेला उधान आलेले आहे.

माढा तालुक्यातील प्रशासनाला आदेश देऊच कशी शकतात, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, शिवतेजसिंह मोहिते पाटील हे अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे तालुका, जिल्हा लेव्हलचे पद नाही. पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा एखाद्या समितीचे सभापती असे कोणतेच पद नाही तरीसुद्धा, प्रशासनाला सूचना करतात, याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.

शेतकरी व सर्व सामान्य जनता अडचणीत असताना लोकप्रतिनिधी किंवा विविध राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी आपापल्या परिसरात मदत करणे साहजिक आहे मात्र, शिवतेजसिंह मोहिते पाटील माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे माजी सरपंच व वास्तव्यास आहेत. तसा अर्थाअर्थी माढा विधानसभा मतदार संघ व माढा तालुक्यात काहीही संबंध येत नाही. तरीसुद्धा हस्तक्षेप सुरू असल्याची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. शिवरत्न कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून कोणत्याही तालुक्यात व जिल्ह्यात काम घेऊ शकतात मात्र, लोकप्रतिनिधी सारखे प्रशासनाला आदेश करण्याकरिता तालुक्याचे व जिल्ह्याचे महत्त्वाचे पद अथवा जबाबदारी असावी लागते, असाही सूर माढा तालुक्यातील जनतेमधून येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort