Uncategorizedताज्या बातम्याराजकारण
महाराष्ट्राचे माजी दुग्धविकास मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे सरसेनापती महादेव जानकर यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर.
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांचा बूथ प्रमुख मार्गदर्शन दौरा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता इंदापूर येथे, दुपारी २ वाजता माळशिरस येथे, सायंकाळी ५ वाजता सांगोला येथे हा दौरा होणार आहे.


तर रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता मंगळवेढा येथे आणि दुपारी २ वाजता जत येथे, अशा पद्धतीने दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी संबंधित तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तात्काळ या कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी केल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
