यंदा खते व बियाणे मुबलक मात्र, पावती जपून ठेवा – कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाणे
खरीपाच्या पार्श्वभूमीवर कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाणे यांचा सल्ला
सोलापूर (बारामती झटका)
पावसाला यंदा लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि बियाणाचा तुटवडा होवू नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यंदा कृषी विभागाने तीन ते साडेतीन लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र गृहीत धरुन नियोजन केले आहे. त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतेही विविध वितरकांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, मात्र शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि बियाणाची खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावी. तसेच त्याची पावती जपून ठेवावी, असे आवाहन कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाणे यांनी केले आहे.
खरीप हंगामात अनेक कंपन्यांचे बियाणे बाजारात येते. तसेच काही ठिकाणी रासायनिक खतांमध्ये बोगसगिरी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावीत, तसेच त्याची पावतीही जपून ठेवावी असे आवाहन कृषी विभागाचे अधिक्षक तथा कृषी अधिकारी गवसाणे यांनी केले आहे. अनेक वेळा स्वस्तात बियाणे आणि खते मिळवल्यामुळे शेतकरी विक्रेत्यांकडून पावती घेत नाहीत. तसेच जी खते वापरली त्याचा नमुनाही नसतो. त्यामुळे ऐनवेळी पिकांना मोठा फटका बसतो. शेतकन्यांचे वर्षभराचे पीक वाया जाते. संपूर्ण हंगामच वाया गेल्यामुळे शेतक-यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. तसेच या कंपन्या बोगस असल्याने त्या पुन्हा कोठे ही सापडत नाहीत. तसेच त्यांच्यावर कायेदशीर कारवाईही करता येत नाही. त्यामुळे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच ती पावती जपून ठेवावी, असे आवाहन कृषी अधिक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा महाबीजचे सोयाबीने ३० टक्का कमी किमंतीत सोलापूर जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोयाबीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा महाबीजचे सोयाबीन पिकाचे बियाणे ३० टक्के कमी किंमतीत मिळणार असल्याची माहितीही कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.