युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल महाराज सुळ यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार..

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक स्व. अशोक वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन….
माळशिरस (बारामती झटका)
ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची ता. माळशिरस, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांचे शनिवार दि. 02/11/2024 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये 61 फाटा, वाघमोडे वस्ती, माळशिरस येथे माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक स्वर्गीय अशोक रामहरी वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन सौ. कल्पना व श्री. रामहरी दादा वाघमोडे, सौ. वर्षा व श्री. देविदास रामहरी वाघमोडे, श्रीमती सुरेखा अशोक वाघमोडे, चि. यश अशोक वाघमोडे, चि. सोहम अशोक वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

स्वर्गीय अशोक वाघमोडे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस होता. बैलगाडी शर्यतीचा मोठा नाद होता, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशोक वाघमोडे यांचे नाव आहे. नेहमी हसतमुख असणारे अशोक वाघमोडे यांचा मृत्यू परिवारासह मित्रपरिवार यांना मनाला चटका लावून जाणारा होता. त्यांच्या आठवणीसाठी वाघमोडे परिवार व मित्रपरिवार यांनी त्यांच्या कायम स्मरणार्थ व समाजामध्ये सेवा करण्याकरता स्व. मा. नगरसेवक अशोक वाघमोडे बहुउद्देशीय संस्था, माळशिरस रजिस्ट्रेशन केलेली असून सदरच्या संस्थेमार्फत दि. 02/11/2024 रोजी सकाळी 09 ते दुपारी 02 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे स्व. मा. नगरसेवक अशोक वाघमोडे बहुउद्देशीय संस्था, माळशिरस यांच्या वतीने ही रक्तदान हेच श्रेष्ठदान असे समजून सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा, असेही आव्हान करण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.