युवा नेते संकल्प डोळस यांच्या लढ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकतीने पाठीमागे उभा राहणार, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले…

माळशिरस तालुका अनुसूचित जाती जमाती कृती समितीच्या वतीने संकल्प डोळस यांचा विशेष सन्मान…
दसुर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस त्यांनी बनावट खाटीक धनगर जातीचा दाखला काढलेले उत्तमराव जानकर यांच्या बनावट जातीच्या दाखल्याच्या विरोधात न्यायालयात दुबारा प्रक्रिया सुरू झालेली आहे. युवानेते संकल्प डोळस यांच्या लढ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकतीने पाठीमागे उभा राहणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
माळशिरस तालुका अनुसूचित जाती कृती समितीच्या वतीने युवा नेते संकल्प डोळस यांचा दसुर येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, सरचिटणीस मारुती खांडेकर, बोंडले गावचे उपसरपंच महेंद्र लोंढे, समाजसेवक दादा गालफाडे, रिपाईचे संतोष बनसोडे यांनी सन्मान केला.

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शंकरनाना देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती हंसराज माने पाटील, करणभैय्या प्रकाशराव पाटील, मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांसह अनेकजण उपस्थित होते.
स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांच्या स्मरणार्थ दसुर येथे श्री स्वामी समर्थ मठाचा सहावा वर्धापन दिन मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चारीट्रेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कांचन हनुमंतराव डोळस व युवा नेते संकल्प डोळस यांच्या पुढाकाराने सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमात युवा नेते संकल्प डोळस यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव करीत त्यांना पुढील न्यायालयीन वाटचालीसाठी माळशिरस तालुका अनुसूचित जाती जमाती कृती समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



