युवा उद्योजक दिनेश भोसले यांना युवा महाराष्ट्र फाऊंडेशनचा महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2024 जाहीर

माळशिरस (बारामती झटका)
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग-व्यवसायात यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल त्यांना युवा महाराष्ट्र फाऊंडेशनचा महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये युवा उद्योजकांनी मोठी भूमिका बजावली असते, अशा कर्तुत्ववान व्यक्तींचा व उद्योजकांचा युवा महाराष्ट्र फाऊंडेशन सन्मान करून त्यांना पुरस्काररुपी प्रेरणा देतात. यावर्षीचा युवा महाराष्ट्र फाऊंडेशनच्या महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2024 माळशिरस येथील युवा उद्योजक दिनेश संभाजी भोसले यांना प्रदान करण्यात येत आहे.
युवा उद्योजक दिनेश भोसले हे पुणे, सध्या राहणार माळशिरस येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी डी.एस,ट्रेडर्स, भोसले डेव्हलपर्स, डी.एस. फिनिक्स अभ्यासिका, समर्थसाई ऑल इन्शुरन्स सर्विस या क्षेत्रात उंच भरारी घेवून यशस्वी झाले आहेत. दिनेश भोसले यांनी शिक्षकाची नोकरी करत असताना त्यासोबत स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकरचे काम चालू केले. हळूहळू काम करत नोकरी बघत आज त्यांच्याकडे पाच वर्षांमध्ये 10500 डिमॅटच्या अकाउंट आहेत. आत्तापर्यंत पाच हजार पेक्षा अधिक लोक त्यांच्या शेअर मार्केटचा क्लास करून गेले आहेत. व्यवसाय मोठा वाढला, या बिझनेसनंतर त्यांनी भोसले डेव्हलपर्स म्हणून पुण्यात कन्स्ट्रक्शन बिजनेस चालू केला, त्यात पण भरपूर यश मिळाले. ग्रामीण भागातील मुलांसाठी एमपीएससी, यूपीएससीसाठी अकलूजमध्ये लायब्ररी चालू केली. समर्थसाई ऑल इन्शुरन्स सर्विस नावाने सगळ्या प्रकारचा इन्शुरन्स करून देणारी एजन्सी चालू केली.

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या युवा उद्योजक दिनेश भोसले यांना यावर्षीचा युवा महाराष्ट्र फाऊंडेशनचा महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.