ताज्या बातम्यासामाजिक

युवा उद्योजक शत्रुघ्न रणनवरे यांनी शून्यातून प्रगती केली.

मांडकी (बारामती झटका)

“केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे” याचा प्रत्यय प्रतिकूल परिस्थितीत शत्रुघ्न रणनवरे यांनी उद्योग व्यवसायात उंच शिखर गाठले आहे, यातून येत आहे. शून्यातून प्रगती करून यशस्वी युवा उद्योजकांमध्ये शत्रुघ्न रणनवरे यांची गणना केली जात आहे. आज त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनपटावर टाकलेला प्रकाशझोत…

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील मांडकी हे दुष्काळी गाव. याच गावात शत्रुघ्न रणनवरे यांचा जन्म झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले पण, गरीब परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. रोजीरोटीसाठी मुंबई गाठली. उद्योग व्यवसायासाठी मुंबई नगरीमध्ये काय करायचे. असा प्रश्न असताना लहानपणापासून इलेक्ट्रिकल खेळण्यापासून नाद होता तोच नाद जोपासला. त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रीकल वायरमन म्हणून कामाला सुरवात केली. मिळेल त्या इलेक्ट्रिक ठेकेदाराच्या हाताखाली काम केले.

गरीब परिस्थिती समोर दिसत असल्याने अहोरात्र कष्ट केले. प्रामाणिकपणा व शुद्ध आचार विचार यामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले. दिवसेंदिवस प्रगती करीत दिवस बदलत जातात. इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टरपर्यंत मजल मारली. स्वतःचा व्यवसाय सुरू करून प्रगती केलेली आहे. कृष्णा बिल्डरींगच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात पर्दापण केले.

ग्रामीण भागातील तरुणाने गरीब परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण केले आहे. आज युवा उद्योजक शत्रुघ्न रणनवरे यांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांच्यावर मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांची उद्योग व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, याच बारामती झटका परिवार यांचेकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button