युवा नेते दिनेश ताम्हणे यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेशाने पूर्व भागात स्वाभिमानीने भरारी घेतली

शेतकऱ्यांचे दैवत खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आंदोलनवीर तालुकाध्यक्ष अजितभैय्या बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेत इनकमिंगला सुरुवात
माळशिरस (बारामती झटका)
शेतकऱ्यांचे दैवत मा. खासदार राजू शेट्टी साहेब आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झंझावाती कार्य सुरु आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातून अनेक पदाधिकाऱ्यांसह तरुणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. आज पूर्व भागातील माळीनगरचे युवा नेते दिनेश ताम्हणे यांनी शेतकऱ्यांचे दैवत खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंदोलनवीर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजितभैय्या बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
यावेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, डॉ. सचिन शेंडगे, रामचंद्र माने देशमुख, अमरसिंह माने देशमुख, पै. दादा काळे, राजाभाऊ खरात, सचिन बोरकर, आप्पा शिंदे आदी उपस्थित होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.