ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य यांच्या ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अडचणीत वाढ..

माळशिरस तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील दहा गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामध्ये माळीनगर, धर्मपुरी, कारूंडे, वाफेगाव, कोंढारपट्टा, दहिगाव, देशमुखवाडी, लवंग, कण्हेर, सवतगव्हाण या ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस उजाडला मात्र, शासनाची ऑनलाईन वेबसाईट उघडली नसल्याने अनेक सदस्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. पहिल्याच दिवशी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अनेकांचा मनसुबा धुळीला मिळालेला आहे. गावगाड्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या शासनाच्या वेबसाईटमुळे अडचणीत वाढ झालेली आहे. महिलांना निवडणूक नको, अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. सध्या शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र जोरदार सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता तहसील कार्यालय व सेतूमध्ये इतरत्र वेबसाईट चालू होण्याची वाट पहात बसावे लागत आहे. नवरात्राचा उपवास आणि ऑक्टोंबर हिट यामुळे महिला वर्गांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर येत आहे.

थेट जनतेतील सरपंच पदामुळे निवडणुकीत रस्सीखेच, रंगत व चुरस वाढली आहे. या निवडणुकीमध्ये दि. १६/१०/२०२३ ते २०/१०/२०२३ या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागवण्यात व सादर करण्यात येणार आहे. तसेच या नामनिर्देशन पत्राची छाननी दि. २३/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत असणार आहे. तसेच दि. २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असणार आहे. निवडणूक चिन्ह नेमून देणे व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी दि. २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३ नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मतदान दि. ०५/११/२०२३ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी व निकाल दि. ०६/११/२०२३ रोजी करण्यात येणार आहे.

या दहा गावांचे सरपंच पदाचे व वार्डनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, महसूल नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अव्वल कारकून भाकरे यांनी सर्व निवडणुकीचे नियोजन तयार केलेले आहे.

दहा गावांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमलेले आहेत. कन्हेर व सवतगव्हाण श्री. एस. के. खंडागळे, वाफेगाव व कोंढारपट्टा श्री. व्ही. टी. लोखंडे, कारूंडे व धर्मपुरी श्री. एस. ए. भोसले, देशमुखवाडी श्री. एस.पी. रणदिवे, पिलीव, सुळेवाडी व डोंबाळवाडी (खुडूस) श्री. आर. टी. ननवरे, माळीनगर व लवंग श्री. सी. एस. भोसले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना ग्रामविकास अधिकारी सहकार्य करीत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort