ताज्या बातम्याराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची माढा लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रचाराची रणनीती ठरविण्याची बैठक…

महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या भावना व समस्या जाणून घेऊन प्रचाराची रणनीती ठरणार – अध्यक्ष शिवाजीराव देशमुख

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व ज्येष्ठ नेते सुरेशआबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना व समस्या जाणून घेऊन प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या बैठकीचे आयोजन पुणे-पंढरपूर रोडवर, पालवे-पाटील कॉम्प्लेक्स मांडवे, सदाशिवनगर येथे रविवार दि. २८/४/२०२४ सकाळी ८.३० वाजता कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केलेले आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी केलेले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट महायुतीमध्ये समाविष्ट आहे. माढा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीतील पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort