माळशिरस येथील महादेव रेवाप्पा बलाक्षे – वाणी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

फोटोग्राफर रविराज वाणी व सोमनाथ वाणी यांना पितृषोक…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील महादेव रेवाप्पा बलाक्षे वाणी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी शनिवार दि. २१/११/२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता माळशिरस येथील माऊली नगर मधील राहत्या निवासस्थानी अल्पशा आजाराने मृत्यू झालेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, भाऊ, भाऊजी, पुतणे असा परिवार आहे. फोटोग्राफर रविराज वाणी व सोमनाथ वाणी यांचे ते वडील होते. त्यांचा दफनविधीचा कार्यक्रम माळशिरस येथील लिंगायत स्मशानभूमी येथे दुपारी ५ वाजता शोकाकुल वातावरणात करण्यात आला. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम सोमवार दि. २३/११/२०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता होणार आहे..
महादेवराव वाणी यांना काका या टोपण नावाने ओळखत होते. शेती महामंडळामध्ये काकांनी मुकादम म्हणून काम केलेले आहे. शेती महामंडळाच्या वाडी नंबर दोन या ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्यास होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर माळशिरस येथील माऊली नगर येथे स्वतःचे घर बांधून वास्तव्यास होते. रविराज व सोमनाथ यांनी उल्का डिजिटल फोटोग्राफी व्यवसायातून प्रगती केलेली आहे. सेवानिवृत्त कार्यकाळामध्ये काका आपल्या मुलांच्या दुकानासमोर बसून मित्र व सवंगडी यांच्या समवेत वेळ घालवत असत. अतिशय सुसंस्कृत व मनमिळावू स्वभाव होता. बोलण्यामध्ये गोडवा व आपलेपणा होता. काकांनी आपल्या मुलांवर व पुतण्यांवर चांगले संस्कार केलेले आहेत. त्यांनी सुद्धा फोटोग्राफीच्या माध्यमातून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. वाणी परिवार यांचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित व सुरळीत चालू होता.

काकांच्या अचानक जाण्याने वाणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि काकांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



