नातेपुते नगरीच्या भांड परिवाराचा राजकीय वारसा युवा नेते अक्षयभैय्या भांड समर्थपणे पुढे नेत आहेत…

कार्यकुशल व कर्तृत्ववान युवा नेतृत्वाला भविष्यात संधी मिळाल्यास संधीचे सोने करणार!
नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात उद्योग व्यवसाय, शिक्षण, कुस्ती, व्यापार, आर्थिक उलाढाल, बँका, पतसंस्था, वेगवेगळ्या वस्तूंचे मॅन्युफॅक्चरिंग अशी नातेपुते नगरीची वेगळी ओळख आहे. नातेपुते नगरीच्या भांड परिवाराचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षयभैय्या भांड पुढे नेत आहेत. कार्यकुशल व कर्तृत्ववान युवा नेतृत्वाला भविष्यात संधी मिळाल्यास संधीचे सोने करणार, अशा पद्धतीने राजकीय प्रवास सुरू आहे.
तीन पिढ्यांचा वारसा!
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात भांड परिवारातील स्वर्गीय रामचंद्र भांड यांनी नातेपुते नगरीचे सरपंच पदावर उत्कृष्ट काम करून गावची जडणघडण केलेली आहे. सोलापूर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर परिसरातील मूलभूत सुविधा व अनेक विकास कामे केलेली आहेत.
स्वर्गीय चंद्रशेखर भांड यांनी माळशिरस पंचायत समिती उपसभापती पदावर काम केलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या विशेष करून पश्चिम भागामध्ये उल्लेखनीय कार्य करून आपला ठसा उमटवलेला आहे. अजय भांड यांनीही नातेपुते ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावर काम केलेले आहे.
पराभवाने खचले औनाहीत!
भांड परिवारातील युवा नेतृत्व अक्षयभैय्या भांड परिवारातील राजकीय वारसा जोमाने पुढे नेत आहेत. नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर अक्षय भांड यांचा निसटता पराभव झालेला आहे. पराभवाने खचून न जाता जनतेची सेवा अविरतपणे सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यावर प्रेरित होऊन अक्षयभैय्या भांड यांनी राजकारणामध्ये कार्यातून आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर काम केलेले आहे. दादांच्या पश्चात विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची व विकास कामे सुरू आहेत.

जनतेच्या कामात सतत व्यस्त!
अक्षयभैय्या यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केलेले आहे. सतत सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कार्यामध्ये व्यस्त असतात. भांड परिवार राजकारणाबरोबर उद्योग व्यवसायामध्येही अग्रेसर आहेत. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, परमिट रूम, बियर बार, लॉज, दवाखाना अशा उद्योगांमध्ये उंच भरारी घेतलेली आहे.
अक्षयभैय्या यांचं कार्यकुशल व कर्तृत्ववान युवा नेतृत्व आहे. भविष्यात संधी मिळाल्यास संधीचे सोने करणार, असा राजकीय प्रवास सुरू आहे. अक्षयभैय्या यांच्याकडून वरिष्ठ पातळीवरून नेतेमंडळी व कार्यकर्त्यांकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



