धर्मपुरी येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संस्थेच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषीमित्रांकडून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषीदूतांनी गावातील शेतकरी बांधवांना गुलाबाची फुले देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कृषी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच प्रत्यक्ष शेतस्तरावरील कामाचा अनुभव मिळणार आहे. कार्यक्रमांतर्गत कृषीदूत गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून विविध कृषीविषयक उपक्रम, मार्गदर्शन, प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रम राबविणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, कृषी व्यवस्थापन व विस्तार शिक्षणाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या कालावधीत कृषीदूत गावात विविध कृषी विषयक प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, पीक निरीक्षण, मृदा परीक्षण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी सल्ला केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होऊन शेती विकासास चालना मिळण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास सरपंच सौ. निता नवनाथ झेंडे, उपसरपंच श्री. नितीन नामदेव निगडे, ग्रामसेवक श्री. सुरेश विठ्ठल निंबाळकर, तसेच प्रगतशील शेतकरी व समस्त गावकरी आदी उपस्थित होते. यावेळी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत अजय निंबाळकर, शिवरत्न कचरे, साहिल कैचे, तुषार तांबे, संदीप शेलार, दीपक गोडसे, दिग्विजय घोगरे, रोहन साळुंखे, विश्वतेज देवकर व आर्यन जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर.जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



