कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून धडक मारलेल्या रणजितदादांनी, जिल्ह्याच्या साखर पट्ट्यातही सर्वाधिक दर केला जाहीर…

रणजीतदादा व जिजामाला वहिनीसाहेबांच्या नेतृत्वाखाली बळीराजाला मोठा दिलासा, उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

फलटण (बारामती झटका)

सातारा जिल्हा बँकेवर नुकतेच बिनविरोध संचालक म्हणून धडक मारलेल्या रणजितदादांनी, आता जिल्ह्याच्या साखर पट्ट्यातही सर्वाधिक दर जाहीर केला आहे. ‘स्वराज’च्या या धडाकेबाज घोषणेमुळे फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले आहे.

सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रात आपला वेगळा दबदबा निर्माण केलेल्या ‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’ने (फलटण) यंदाच्या गाळप हंगामासाठी उसाचा दर जाहीर करत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. सन २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन तब्बल ३,९११/-(तीन हजार नऊशे अकरा रुपये) इतकी पहिली उचल देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा कारखान्याच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘स्वराज’ ने जाहीर केलेला हा दर सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक असल्याने, बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित बिनविरोध संचालक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा कारखान्याच्या संचालिका अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक आणि शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका रणजितदादांनी घेतली असून, या सर्वाधिक दराच्या घोषणेतून त्यांनी पुन्हा एकदा आपण ‘बळीराजाचे कैवारी’ असल्याचे सिद्ध केले.

‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’चे संचालक उदय पाटील याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, “सध्या सुरू असलेल्या सन २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे गाळपास 2 सातारा जिल्ह्यातील ऊसाला प्रति मेट्रिक टन ३,९११ रुपये इतकी उचल त्वरित अदा करण्यात येणार आहे. तसेच, या हंगामात उत्पादित साखरेला बाजारात मिळणारा एकूण सरासरी विक्री दर आणि कारखान्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, Más información अंतिम बिलाबाबत (पेमेंट) योग्य तो आणि शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल.”

नुकतेच ‘स्वराज’ कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड’ मिळाला आहे. Más información ॲड. सौ. जिजामाला वहिनीसाहेब यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे आणि रणजितदादांच्या दूरदृष्टीमुळे ‘स्वराज’ने आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button