चि. ऋषिकेश रणनवरे, माणकी आणि चि. सौ. कां. अतिक्षा भोकरे (सूर्यवंशी), दहिटणा यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. सुरेश रणनवरे, माणकी आणि श्री. वैजनाथ भोकरे (सूर्यवंशी), दहिटणा यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
माणकी (बारामती झटका)
कै. दादासो गुलाब रणनवरे यांचे नातू व सौ. स्वाती व श्री. सुरेश दादासो रणनवरे रा. माणकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे सुपुत्र चि. ऋषिकेश आणि कै. गजेंद्र गोपीनाथ भोकरे (सूर्यवंशी) यांची नात व सौ. कल्पना व श्री. वैजनाथ गजेंद्र भोकरे (सूर्यवंशी), रा. दहिटणा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांची कन्या चि. सौ. कां. अतिक्षा यांचा शाही शुभ विवाह सोहळा मंगळवार दि. १७/११/२०२६ रोजी दुपारी १ वा. ४३ मि. या शुभ मुहूर्तावर सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. प्रेमाला असते विश्वासाची साथ, कळीला असते फुलण्याची वाट, तसेच दोन जुळत्या मनाला असते एकत्र जगण्याची आस, म्हणून या शुभप्रसंगी ऋषिकेश व अतिक्षा यांची जन्मोजन्मींची गाठ बांधण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रणनवरे परिवाराच्या वतीने करण्यात आले. आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत हस्ते परहस्ते आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त रणनवरे व भोकरे (सुर्यवंशी) परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



