ताज्या बातम्याराजकारण

सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी जयाभाऊ आणि रणजीतदादा एकाच नाण्याच्या दोन बाजू…

दोघेही चेअरमन होतील, नाहीतर विचाराचा सर्वसामान्य माणदेशी कार्यकर्त्याला चेअरमन करतील – राजकीय वर्तुळात खळबळ!

सातारा (बारामती झटका)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची निवडणूक बुधवार, दि. 18/11/2026 रोजी संपन्न होत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे संचालक मंडळ निवडून आलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे जास्त संचालक निवडून आलेले आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या संगनमताने, सातारा जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या सहमतीने सातारा जिल्हा बँकेवर चेअरमन पदाची धुरा माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे या दोघांकडे जाण्याची राजकीय वर्तुळामध्ये शक्यता वर्तवली जात आहे.

जयाभाऊ आणि रणजीतदादा – एकाच नाण्याच्या दोन बाजू!
जयाभाऊ आणि रणजीतदादा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही चेअरमन पदासाठी इच्छुक नाहीत, मात्र वरिष्ठांनी जबाबदारी दिल्यानंतर स्वीकारावी लागणार आहे.

त्यामुळे जयाभाऊ आणि रणजीतदादा चेअरमन होतील, नाहीतर विचाराचा सर्वसामान्य माणदेशी कार्यकर्त्याला चेअरमन करतील, अशीही राजकीय वर्तुळामध्ये शक्यता वर्तवली जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button