कराडच्या डॉ. अहिल्या विठ्ठल वाघमोडे (M.Sc., Ph.D.) यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘लिनियन सोसायटी’ ची फेलोशिप

कराड (बारामती झटका)
एस. जी. एम. महाविद्यालय, कराड येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. अहिल्या विठ्ठल वाघमोडे (M.Sc., Ph.D.FEAES) यांची जगातील सर्वात प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांपैकी एक असलेल्या ‘द लिनियन सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड किंगडम’ च्या फेलो (FLS) म्हणून निवड झाली आहे.
१७८८ मध्ये स्थापन झालेली लिनियन सोसायटी ही वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्र क्षेत्रातील जगातील सर्वात जुनी आणि सर्वोच्च मानाची संस्था मानली जाते.

वनस्पतीशास्त्र, वनस्पती विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील डॉ. वाघमोडे यांच्या उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
“निसर्गाचा शोध, विज्ञानाची प्रगती” या ब्रीदवाक्यासह केलेल्या कार्याचा कराडसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.
डॉ. अहिल्या विठ्ठल वाघमोडे (M.Sc., Ph.D.FEAES), FLS
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



