ताज्या बातम्यासामाजिक

चि. सौ. कां. प्रिया काळे, भांब आणि चि. अजिंक्य पिसे, नातेपुते यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक

श्री. सोपान गणपत काळे
(मा. सरपंच, ग्राम. भांब)
श्री. भिमराव संभाजी काळे
(मा. उपमुख्य अभियंता म्हाडा मुंबई)
श्री. संजय निवृत्ती काळे (BE Civil)

भांब (बारामती झटका)

कै. संभाजी शंकर काळे यांची नात व सौ. शोभा व श्री. भिमराव संभाजी काळे रा. कामोठे, नवी मुंबई, मु. भांब, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची द्वितीय सुकन्या चि. सौ. कां. प्रिया (ME Civil) आणि कै. पांडुरंग तुकाराम पिसे यांचे नातू व सौ. मंगल व श्री. हनुमंत पांडुरंग पिसे रा. खारघर, नवी मुंबई, मु. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे द्वितीय सुपुत्र चि. अजिंक्य (PG-DGSD) यांचा शाही शुभ विवाह सोहळा समोर दि. १६/११/२०२६ रोजी दुपारी १ वाजून ३१ मिनिटे मधुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते-माळशिरस रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. सोपान गणपत काळे (मा. सरपंच, ग्राम. भांब), श्री. भिमराव संभाजी काळे (मा. उपमुख्य अभियंता म्हाडा मुंबई), श्री. संजय निवृत्ती काळे (BE Civil) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रेमाला असते विश्वासाची साथ, कळीला असते फुलण्याची वाट, तसेच दोन जुळत्या मनाला असते एकत्र जगण्यांची आस, म्हणून कपरिवारात उपस्थित राहून बांधा प्रिया व अजिंक्य यांची जन्मोजन्मींची गाठ, असे श्रीमती रुक्मिणी संभाजी काळे, श्रीमती यमुना निवृत्ती काळे, सौ. शोभा व श्री. भिमराव संभाजी काळे (मा. उपमुख्य अभियंता म्हाडा, मुंबई,
सौ. निर्मला व श्री. शिवाजी संभाजी काळे, सौ. विजया व श्री. किसन संभाजी काळे (नवी मुंबई पोलीस) यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत हस्ते परहस्ते आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त काळे व पिसे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button