श्री बळीराजा पाणी वापर संस्था विजयवाडी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. संजय भाऊराव लावंड यांची बिनविरोध निवड…

विजयवाडी (बारामती झटका)
नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत खंडाळी पाटबंधारे शाखा कार्यालय अकलूज संलग्न श्री बळीराजा पाणी वापर संस्था विजयवाडी, ता. माळशिरस या संस्थेची स्थापना होऊन श्री. संजय भाऊराव लावंड यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झालेली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळात श्री. करण प्रकाश पाटील, कमल सदाशिव गोडसे, सतीश आबासाहेब इंगळे, अरुणा अर्जुन पवार, गौतम भिवाजी कांबळे, यशवंत केशव पाटील, सुनिता बाळासाहेब लावंड, संतोष नारायण लावंड यांच्या निवडी झालेल्या आहेत.
यावेळी विजयवाडी गावचे विद्यमान सरपंच उमेश भंडारे माजी सरपंच धैर्यशील लावंड, हनुमंत पवार, संजय इंगळे, पोलीस पाटील अनिल लावंड पाटील यांच्यासह विजयवाडी गावातील आजी-माजी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



