ताज्या बातम्याराजकारण

माळशिरसमध्ये तिरंगी लढतीमुळे रंगत वाढली… कपबशी की शिट्टी? मतदारांचे देवदर्शन अन् लक्ष्मी दर्शनही होणार ?

बाबाराजे देशमुख विरुद्ध अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यात निकराची लढत, ज्ञानराज पाटील यांचा ट्रॅक्टर बँकेत जाणार का ?

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर संचालक मंडळ निवडणूक सन 2026-27 ते 2030-31 या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील बँकेच्या संलग्न असणाऱ्या शेतकरी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषी सेवा सोसायटी एकूण 141 मतदार आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत लागलेली आहे.

तिघांमध्ये लढत –

  1. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख – चिन्ह कपबशी
  2. माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील – चिन्ह शिट्टी
  3. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील – चिन्ह ट्रॅक्टर

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून बाबाराजे देशमुख व अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यात निकराची लढत होण्याची चर्चा सुरू आहे. ज्ञानराज पाटील यांची दोघांपेक्षा मतांची आकडेवारी कमी असल्याची चर्चा आहे.

नेमका कपबशीवर ? का शिट्टीवर घसरलं ?
बाबाराजे देशमुख यांची कपबशी तर अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे शिट्टी चिन्ह आहे. ज्ञानराज पाटील यांचा ट्रॅक्टर सोलापूर जिल्हा बँकेत जात नाही, मात्र नेमका कपबशीवर ?, का शिट्टीवर घसरलं याची तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यात तिरंगी लढतीमुळे रंगत वाढलेली आहे. मतदारांना देवदर्शन व लक्ष्मी दर्शन सुद्धा होऊ शकते, अशीही कुजबूज तालुक्यात सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button