ताज्या बातम्याराजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बारामती लोकसभेबाबतची भूमिका गुलदस्त्यात ?

स्वाभिमानीच्या बैठकीत निर्णयाचे सर्व अधिकार राजू शेट्टींना प्रदान…

भवानीनगर (बारामती झटका)

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीबाबत भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्वच तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये शेकडो पदाधिकारी व हजारो मावळे आहेत. यांच्यासोबत हजारो मतदार आहेत. यामुळे या अटीतटीच्या लढतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार आहे.

इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न, ऊस दराची यशस्वी दरवाढ, दुधाचे आंदोलन, कॅनॉलच्या पाण्याचे लढे, पिक विमा व दुष्काळ निधीचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवरती स्वाभिमानीने ठोस भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आकर्षण निर्माण झालेले आहे. त्यामुळेच इंदापूर तालुक्यामध्ये घोडदौड जोरात चालू आहे.

भवानीनगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संपर्कप्रमुख, तालुका संघटक, सोशल मीडिया प्रमुख, उपाध्यक्ष हे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळेला लोकसभा मतदारसंघातील महायुती की महाविकास आघाडी या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की, अन्य कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत चर्चा विनिमय करण्यात आले. सरते शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने निर्णयाचे अधिकार राजू शेट्टी यांना प्रदान केले.

राजू शेट्टी ज्या उमेदवाराचा प्रचार करायला सांगतील अथवा पाठिंबा देतील तो आदेश मान्य करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एक-दोन दिवसांमध्ये स्वाभिमानीच्या पाठिंब्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी सांगितले. राजू शेट्टी यांच्या उमेदवाराला पाठिंबा देताना महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून फसवणूक करण्यात आली. त्यामुळे राजू शेट्टी ‘एकला चलो’ च्या भूमिकेतच स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांना कोणाला पाठिंबा देण्याचा आदेश देणार ?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रियाताई सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहीनी पवार यांना मिळावा, यासाठी बारामती लोकसभेतील आमदार वरिष्ठ पदाधिकारी नेते यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्याशी संपर्क साधल्याचे सूत्रांकडून समजते. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी स्वाभिमानीचा पाठिंबा मिळावा म्हणून शर्तीचे प्रयत्न करत आहेत. याबाबत राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार ?, आपला पाठिंबा कोणाला देणार ?याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

स्वाभिमानीचे प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मांडणी करणारे वक्ते व प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आणि ग्राउंड लेव्हलला असणारे नेटवर्क यामुळे स्वाभिमानी आपल्यासोबत असावी, असा प्रयत्न लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपल्याकडे वळवण्यामध्ये सगळ्याच उमेदवारांचा प्रयत्न दिसतो आहे. यावेळी डुके वकील, इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब झगडे, बारामती तालुकाध्यक्ष विलास सस्ते, दौंड तालुका अध्यक्ष विकास सोनवणे, भोर तालुका अध्यक्ष प्रशांत बांदल, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, संपर्कप्रमुख राजकुमार शिंदे, तालुका संघटक मनोज घोळवे, तालुका युवा अध्यक्ष मधुकर वाघमोडे, उपाध्यक्ष विशाल भोईटे, सोशल मीडिया प्रमुख राहुल घोळवे, जिल्हा खजिनदार नितीन घोळवे, शिवाजी नाना रुपनवर, औदुंबर आव्हाड, सचिन वाघमोडे, कुंभार सर, सागर घोळवे, राजेंद्र जाधव, दत्तामामा झेलकर, बापूराव घाडगे, लक्ष्मीकांत घोळवे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort