क्रीडाताज्या बातम्या

नेवरे येथे आट्यापाट्यांच्या भव्य सामन्यांचे आयोजन

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न

नेवरे (बारामती झटका)

मौजे नेवरे ता. माळशिरस, येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. १५/०९/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता आट्या-पाट्यांच्या भव्य सामन्यांचे आयोजन जय शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर सामन्यांचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगरचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील आणि अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यामध्ये नेवरे ग्रामपंचायतचे सरपंच राजाराम झुरूळे, उपसरपंच बापूराव बोबडे, आणि कोंढारपट्टाचे माजी सरपंच विजय भोसले यांच्या वतीने ३१,००१/- रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. नेवरे ग्रामपंचायतीचे सदस्य मुकुंद पाटील आणि नवनाथ कदम, मुंबईचे पीएसआय अजीम शेख यांच्यावतीने २५,००१/- रुपयांचे द्वितीय पारितोषिक देण्यात येणार आहे. नेवरे येथील प्रगतशील बागायतदार नागनाथ पाटील आणि प्रकाश बोबडे, डॉ. गिरीष माने शेंडगे यांच्या वतीने २०,००१/- रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवशंकर विकास कार्यकारी सोसायटी नेवरे चेअरमन प्रशांत बोबडे, नेवरे ग्रामपंचायतीचे सदस्य बाळासाहेब कदम, शिवाजी धुमाळ सर यांच्यावतीने १५,००१/- रुपयांचे चतुर्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. कै. विठ्ठल विश्वंभर शिंदे यांच्या स्मरणार्थ सुरेश शिंदे रोहित मशिनरी नेवरे आणि कोंढारपट्टा येथील प्रगतशील बागायतदार सचिन भोसले यांच्यावतीने १०,००१/- रुपयांचे पाचवे पारितोषिक देण्यात येणार आहे. नेवरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सदाशिव बोबडे आणि समरजीत फ्रुट कंपनीचे शैलेश गायकवाड यांच्यावतीने ५,००१/- रुपयांचे सहावे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या सामन्यांमध्ये वैयक्तिक पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. त्यामध्ये महेश अण्णा जाधव यांच्या वतीने १ हजार रुपयांचे बक्षीस उत्कृष्ट सूरकरी, असलम खुदबुद्दीन तांबोळी यांच्या वतीने १ हजार रुपयांचे बक्षीस उत्कृष्ट फाटी नंबर ६, फिरोज शहाजान शेख यांच्यावतीने १ हजार रुपयांचे बक्षीस उत्कृष्ट फाटी नंबर ५, ज्ञानेश्वर साहेबराव रंदवे आणि पप्पू रंदवे वायरमन यांच्यावतीने १ हजार रुपयांचे बक्षीस उत्कृष्ट फाटी नंबर ४, दीपक किसन बागल यांच्या वतीने १ हजार रुपयांचे बक्षीस उत्कृष्ट फाटी नंबर तीन, अजित अरुण गंभीरे यांच्या वतीने १ हजार रुपयांचे बक्षीस उत्कृष्ट फाटी नंबर दोन असे असणार आहेत.

या कार्यक्रमासाठी मंडप व स्पिकर व्यवस्था शहाजी पाटील, आनंता बोबडे, विलास भिल यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक एक ते पाच नंबरसाठी चषके उदयनराजे उद्योग समूह नेवरे अरुण शिवाजी भोसले यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच फायनल विजेता संघास मेडल विजय पाटील यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर, उत्कृष्ट खेळाडूसाठी ट्रॉफी रमेश पाटील यांच्या वतीने देण्यात येणार आहे. यावेळी प्रमोद व्यवहारे, उत्तरेश्वर सावंत, आयुपदीन तांबोळी, डॉक्टर नितीन साठे, संजय जाधव, अनिल भोसले, चंद्रकांत पाटील, तुकाराम जाधव, बाळासाहेब कुंभार, अस्लम तांबोळी, नितीन मेहता, विजय पाटील, बाळासाहेब नवगिरे, सचिन धुमाळ, संतोष कदम, विष्णू कुंभार, हिंदराव काटकर, संदीप कानगुडे, सोमनाथ परबत, लतीफ तांबोळी, दयानंद शेखदार, वैजनाथ पाटील, सचिन लावंड, अमोल घाटे, भैया माने, सुरेश तळेकर आणि विठ्ठल बोबडे यांच्या वतीने जेवण व्यवस्था करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी दादा श्री डिजिटल नेवरे यांच्यावतीने जाहिरात सोडणे आहे याविषयी अधिक माहितीसाठी ९८६०४००११०, ९६०४६२३४४४,९८५०३५१६०५,७७२१०३७४९० या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त खेळाडू प्रेमी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort