Uncategorizedताज्या बातम्या

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सर्वच्या सर्व अर्ज मंजूर करण्यात आले….

मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, मालोजीराजे देशमुख, संजय कोळेकर यांच्यावरील हरकती फेटाळण्यात आल्या.

अकलूज (बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गट विरोधी गट व अपक्ष यांनी 81 उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एल. एम. शिंदे यांनी सर्व अर्ज वैध केलेले आहेत. मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, मालोजीराजे देशमुख, संजय कोळेकर यांच्या अर्जावरती हरकती घेण्यात आलेल्या होत्या. सदरच्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व पोटनिमाच्या आधीन राहून हरकती फेटाळल्या असल्याने सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण सात जागेसाठी 25 अर्ज आलेले आहेत. त्यामध्ये मोहिते पाटील मदनसिंह शंकरराव यशवंतनगर, रुपनवर मारूतराव नाथा डोंबाळवाडी कुरबावी, चव्हाण शिवाजी चंद्रकांत चंद्रपुरी तांबेवाडी, सावंत नितीन अशोक कोळेगाव, देशमुख शहाजीराव मुधोजीराव नातेपुते, कदम बाबुराव शंकरराव झिंजेवस्ती पिलीव, माने देशमुख बाळासो गुलाबराव वेळापूर, गायकवाड रामचंद्र गजाबा बागेचीवाडी, देशमुख मालोजीराजे शहाजीराव नातेपुते, कदम पाटील श्रीनिवास शिवाजीराव मळोली, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह यशवंतनगर धवलनगर, काकडे नागेश रघुनाथ तांदुळवाडी, देशमुख रणजीतसिंह हंसाजीराव अकलूज, जानकर उत्तमराव शिवदास वेळापूर, सावंत बाळासाहेब बंकट दसुर, वाघमोडे मधुकर भानुदास फोंडशिरस, सावंत राहुल अरुण दहीगाव, इंगळे गणेश भजनदास इंगळेवस्ती संगम, पिसे पांडुरंग किसन गोरडवाडी, वाघमोडे पांडुरंग तुळशीराम 61 फाटा माळशिरस, बोरकर अजित भरत विझोरी, वाळेकर राजेंद्र वसंत महाळुंग, लाटे दादासाहेब अरुण पायरी फुल महाळुंग, पाटील शरद ज्ञानेश्वर महाळुंग, पवार लक्ष्मण अगतराव इस्लामपूर.

सहकारी संस्था मतदार संघ महिला राखीव दोन जागेसाठी सहा अर्ज त्यामध्ये साळुंखे मेघा सचिन तांबेवाडी, सुरवसे अमृता सुधीर खळवे, खराडे रोहिणी जीवन यशवंतनगर, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह यशवंतनगर, कागदे शोभा तानाजी दसुर, पाटील सोनाली राजेंद्र फोंडशिरस.

सहकारी संस्था मतदार संघ इतर मागासवर्गीय एक जागेसाठी पाच अर्ज त्यामध्ये राऊत भानुदास यशवंत नातेपुते, पिसे दत्तात्रेय काशिनाथ यशवंतनगर, फुले भीमराव सदाशिव दहिगाव, बरडकर उत्तम गलबु नातेपुते, बोराटे पोपटराव बाबा फोंडशिरस.

सहकारी संस्था मतदार संघ विमुक्त जाती व भटक्या जमाती एक जागेसाठी चार अर्ज त्यामध्ये पाटील संदीप शामदत्त 60 फाटा पाटील वस्ती माळशिरस, पाटील विश्वजीत सूर्यकांत 60 फाटा पाटीलवस्ती माळशिरस, ओरसे अंबादास सायबु लोणार गल्ली अकलूज, बोरकर अजित भरत विझोरी, असे अकरा जागेसाठी 40 अर्ज सहकारी संस्था मतदार संघात वैध झाले आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण दोन जागेसाठी आठ अर्ज त्यामध्ये पांढरे बापूराव नारायण नातेपुते, पवार लक्ष्मण आगतराव इस्लामपूर, घाडगे विष्णू सदाशिव कोंडबावी, कदम पाटील श्रीनिवास शिवाजीराव मळोली, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह यशवंतनगर, पाटील केशवराव कृष्णराव निमगाव, जगदाळे तानाजी चंद्रकांत उघडेवाडी, देशमुख शहाजीराव मुधोजीराव नातेपुते.

ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती एक जागेसाठी चार अर्ज त्यामध्ये लोखंडे दत्तूराम हरिदास सुळेवाडी, डावरे रामचंद्र अनंता यशवंतनगर, जानकर उत्तमराव शिवदास वेळापूर, सरतापे मिलिंद वाल्मीक वेळापूर.

ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक जागेसाठी चार अर्ज त्यामध्ये भोसले पोपट रंगनाथ उंबरे वेळापूर, घाडगे यशवंतराव बाळासाहेब वेळापूर, गोडसे रामचंद्र दामोदर यशवंतनगर, सावंत राहुल अरुण दहिगाव, ग्रामपंचायत मतदार संघात चार जागेसाठी 16 अर्ज वैध झालेले आहेत.

व्यापारी मतदार संघात दोन जागेसाठी चार अर्ज त्यामध्ये फडे आनंद अशोक संग्रामनगर, गांधी महावीर मगनलाल नातेपुते, बागवान मशीन शमशुद्दीन अकलूज, गरड दीपक महादेव अकलूज असे चार अर्ज वैध झालेले आहेत.

हमाल व तोलार मतदार संघात एका जागेसाठी तीन अर्ज त्यामध्ये डांगरे उद्धव निवृत्ती आनंदनगर, भोसले रवींद्र संदिपान दत्तनगर खंडाळी, कोळेकर संजय युवराज अकलूज असे तीन अर्ज वैध झालेले आहे.

सत्ताधारी मोहिते पाटील गट व विरोधी गटाकडून 61 अर्ज भरलेले आहेत तर श्रीनिवास कदम पाटील यांचे दोन अर्ज आहेत. सर्व मिळून 18 जागांसाठी 63 अर्ज वैध ठरलेले आहेत. दि. 06/04 2023 ते दि. 20/04/2023 तारखेच्या तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची मुदत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort