Uncategorized

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांनी महावस्त्र खरेदीवर बक्षीसामध्ये सहभाग नोंदविला.

नातेपुते येथील यश लाईफस्टाईलमध्ये दसरा ते दिवाळीपर्यंत खरेदीवर हजारो बक्षिसांची खैरात, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते ता. माळशिरस येथील भगवान महावीर पथ, पुणे-पंढरपूर रोडवरील यश लाइफस्टाईल यांनी ‘वस्त्र खरेदी महासणांची, गॅरंटी हमखास बक्षीसाची’ ही स्कीम दसरा ते दिवाळी धमाका सुरू केलेली आहे. याला नातेपुते पंचक्रोशीतील अनेक ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांनीसुद्धा महावस्त्र खरेदीवर बक्षीसामध्ये सहभाग नोंदविलेला होता. यश लाइफस्टाईलचे मालक रोनक चकेश्वरा यांनी मामासाहेब पांढरे यांना खरेदीवरील लकी बक्षिसाचे वितरण केले. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, अतुल उद्योग समूहाचे अतुलशेठ बावकर, ग्रामपंचायतचे माजी सदस्य एडवोकेट रणवीर देशमुख, युवा नेते रणजीत काळे, फडतरी गावचे माजी उपसरपंच आप्पासाहेब रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील कपड्याचे सुप्रसिद्ध व्यापारी करमाळा येथील राजकुमार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते येथे यश लाइफस्टाईल मध्ये दसरा ते दिवाळी दरम्यान वस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षीसांची खैरात केलेली आहे. दोन हजाराची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हमखास बक्षीस मिळणार आहे. दोन हजार रुपयांचे खरेदीवर एक कुपन मिळत आहे. दहा हजाराची खरेदी झाल्यानंतर पाच कुपन मिळत आहेत. यांनी यश लाइफस्टाइल यांनी बक्षीसामध्ये मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रिज, कुकर, मिक्सर, बॉस हँड मिक्सर, बाथरूम सेट, हॉटपॅट सेट, कपबशी सेट, बेडशीट बाऊल, मग, घड्याळ, स्टील बॉटल, बॅग अशा वस्तू लकी ड्रॉ साठी ठेवलेल्या आहे.

नातेपुते पंचक्रोशीसह माळशिरस तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून व आसपासच्या सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातून ग्राहक खरेदीसाठी येत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort