Uncategorized

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील राजकीय नेत्यांची मतपेटीतील राजकीय भवितव्य उघडणार….

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद…

अकलूज (बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 36 उमेदवारांमध्ये चूरशीच्या व रंगतदार निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेले आहे. धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असून निवडणुकीतील राजकीय नेत्यांचे मतपेटीतील भवितव्य आज उलगडणार आहे. तालुका, जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सहकारी सेवा सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघ, हमाल तोलार मतदार संघ अशा चार मतदारसंघासाठी 3587 मतदार होते, त्यापैकी 3467 मतदारांनी निर्भयपणे व पारदर्शक मतदान केलेले आहे.
सहकारी सेवा सोसायटी मतदार संघातील 1822 मतदारांपैकी 1778 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचे पाच मतदान केंद्र होते. त्यामध्ये अकलूज येथे 377 पैकी 367, महाळुंग येथे 391 पैकी 381, पिलीव येथे 310 पैकी 291, माळशिरस येथे 347 पैकी 344, नातेपुते येथे 398 पैकी 395 मतदारांनी मतदान केलेले आहे.

ग्रामपंचायत मतदार संघात 1151 मतदारांपैकी 1122 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचे पाच मतदान केंद्रे होती. त्यामध्ये अकलूज येथे 279 पैकी 264, महाळुंग येथे 166 पैकी 165, पिलीव येथे 223 पैकी 212, माळशिरस येथे 246 पैकी 244, नातेपुते येथे 247 पैकी 247 मतदारांनी मतदान केलेले आहे.

व्यापारी व हमाल मतदार संघाचे अकलूज येथे मतदान केंद्र होते. व्यापारी मतदार संघातील 411 पैकी 369 मतदारांनी मतदान केले. हमाल मतदार संघातील 203 पैकी 188 मतदारांनी मतदान केलेले आहे.

सहकारी सेवा सोसायटी मतदार संघात सत्ताधारी गटाकडून विद्यमान सभापती मदनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मण अगतराव पवार, रुपनवर मारूतराव नाथा, नातेपुते नगर पंचायतचे नगरसेवक ॲड. भानुदास यशवंत राऊत, अहिल्यादेवी सोसायटीचे चेअरमन संदीप शामदत्त पाटील, समविचारी विरोधी गटाकडून अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य ॲड. नागेश रघुनाथ काकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित भरत बोरकर, भीमराव सदाशिव फुले, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश भजनदास इंगळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग तुळशीराम वाघमोडे, राष्ट्रवादीचे दादासाहेब अरुण लाटे, गोरडवाडीचे विद्यमान सरपंच पांडुरंग किसन पिसे, यांचे भवितव्य आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघात विरोधी गटाकडून अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, भाजपचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव बाळासाहेब घाडगे, तर सत्ताधारी गटाकडून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक शहाजीराव मधोजीराव देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती बापूराव नारायण पांढरे, यांचे भवितव्य आहे.

असे सत्ताधारी व समविचारी विरोधक यांचे राजकीय भवितव्य आज मतमोजणीनंतर उलघडणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा टेबलवर मतमोजणी होणार आहे. सुरुवातीस सहकारी सेवा सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघ, हमाल मतदार संघ अशा पद्धतीने मतमोजणी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गोडाऊनमध्ये होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून बारामती झटका यूट्यूब चॅनल वर निकालाचे लाईव्ह थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button