बिबवेवाडी पोलीसांनी प्लॅस्टिक नायलॉन सिंन्थीटीक नायलॉनचा मांजा विकण्याऱ्या इसमांकडून ५० रिळ मांजा जप्त करून गुन्हा दाखल केला.
बिबवेवाडी (बारामती झटका)
सदरबाबत अधिक माहिती अशी की, मा. मुख्य सचिव पर्यावरण विभाग, महा. शासन यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक सीआरटी२०१५/सीआर/३७/टीसी २ दि.३०.०३.२०१५ अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ चे नुसार तसेच मा. पोउआ/वि.शा/जातीय/१३१/२०२५ पोलीस उप आयुक्त विशेष शाखा पुणे शहर यांचे कार्यालयाकडील दि.०४.०१.२०२५ चे भा.ना.सु.र. संहिता २०२३ चे कलम १६३ चे प्रतिबंधक आदेशान्वये पुणे शहर आयुक्तालयात दि.०४.०१.२०२५ ते ०२.०२.२०२५ पर्यंत प्लॅस्टिक नायलॉन सिन्थेंटिक मांजा ने पक्षी व मनुष्यास होणारे इजा (दुखापत) पासून संरक्षण व्हावे या करीता संबंधित प्रतिबंधीत मांजा जवळ बाळगणेस, त्याचा वापर व विक्री करण्यास मनाई आदेश काढलेले आहेत. चायनीज प्रतिबंधीत मांजा विक्रि करणाऱ्याचा शोध घेवून पुढील कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक येवले व स्टाफ असे बिबवेवडी पोलीस ठाणे येथून प्रतिबंधीत मांजा विक्री करणारे इसमांचा शोध घेण्यासाठी निघालो असता पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांना मिळालेल्या बातमीवरून दि. ०५.०१.२०२५ रोजी १२.४५ वा. सुमारास चैत्रबन वसाहत, झेंडे यांचे घराचे जवळ, पासलकर कमानीचे जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे येथे एक पडीक रुममध्ये इसम नामे पृथ्वीराज राजेश म्हस्के वय – २३ वर्षे ,धंदा मांजा विक्रि रा. सिध्दार्थनगर, जुना बसस्टॉपचे मागे, अप्पर बिबवेवाडी पुणे मो.क्र.९०९६४५५६९५ हा १०,०००/- रु. प्लॅस्टिक नायलॉन सिन्थीटीक नायलॉनचे विविध रंगाचे मांजाचे ५० रिळ हा प्रतिबंधित मांजाचा विक्री करीता साठा स्वतःचे कब्जात ठेवून मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांचे विरुध्द बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक ०३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम २२३, १२५, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अर्मलदार सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.