अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज
नातेपुते (बारामती झटका)
आज युगपुरुष राजाधिराज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त त्यांनी केलेले कार्य सर्वांना ज्ञात होणे काळाची गरज आहे. छत्रपती शिवराय शिवनेरीच्या क्षितीजावर उगवलेले प्रकट झालेला, शेकडो वर्षांची काळरात्र, गुलामगीरी, मांडलकी चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने अखंड हिदुस्थान सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य म्हणजे राजे शिवराय होय !
विजेसारखी तलवार चालवून मुठभर मावळ्यांना निधड्या छातीने स्वाभिमानाने हिंदुस्थान हलवणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती होय. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकविणारे, सह्याद्रीचा सिंह, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणजे राजे शिवाजी महाराज होय. शोर्य, पराक्रम, नियोजन, दुरदृष्टी, गुणग्राहकता, व्यवस्थापन, ध्येय, अचूक धोरण, दृष्टीकोन, कुशल संघटक, नियोजनबध्द प्रशासन, मुत्सदीपणा, धाडस, न्यायव्यवस्था, कामाची विभागणी, अर्थनिती, नवनिर्माता, रयतेची बांधीलकी यांचा संगम म्हणजे राजे शिवछत्रपती शिवराय होय ! कठीण परिस्थिती आल्यावर जगायचे कसे शिकवणारे नेतृत्व म्हणजे राजे शिवाजी महाराज होय. चारशे वर्षापूर्वी रयतेचं राज्य आणून जगात पहिली लोकशाही राज्यनिर्माण, आठरा पगड जातीच्या रयतेला मावळा या शब्दात गुंफुन धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करणारे, बहुजन प्रतिपालक, शेतकर्यांचे कैवारी, स्त्रीयांची प्रतिष्ठा जपणारे, संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान म्हणजे राजे शिवाजी महाराज होय. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान, तुम्हीच आमचा स्वाभीमान, तुम्हीच आमचे छत्रपती ! इतिहासाच्या पानावर.., रयतेच्या मनावर…, मातीच्या कणावर…, विश्वासाच्या व विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारे एकमेव अद्वितीय राजे म्हणजे आपले शिवराय होय.
एक विचार समतेचा, एक विचार नितीचा, ना धर्माचा, ना जातीचा. माझा राजा सर्वांचा. आपल्या राजांनी जे झोपले होते ते जागे केले, जे जागे होते ते उभे केले, जे उभे होते ते चालायला लावले, जे चालत होते ते धावायला लावले आणि जे धावत होते, त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण घेऊन स्वाभीमान, मान जागा करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.
तरी या जयंतीनिमित्त राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व गुण आपल्या आचरणात उतरविण्याचे निश्चीय करूया. राजे शिवाजी महाराज यांचे प्रताप शिकवणीसाठी दोन ओळी मानाच्या आपल्या सर्वाच्या शिवरायांसाठी !!।
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ||६||
सर्वगुण संपन्न, महान, एकमेव द्वितीय राजे शिवछत्रपती महाराज यांचे १९ फेब्रुवारी ३९३ व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा !! – श्री. सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
paxil or priligy 60 Notably, 18 F FDG PET allows whole body imaging and can help identify extra retroperitoneal lesions to which RPF may be associated e