Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

……अखेर आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्री पदाचा फुगा फुटला

जत्रा, यात्रा व महोत्सवामधून लहान मुलांनी फुगा आणावा आणि गाडीतून उतरताना फुटावा, अशी रणजितसिंह यांची अवस्था

माळशिरस ( बारामती झटका )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या पाच कॅबिनेट मंत्र्यांमध्ये विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील शपथविधी विधी घेणार आहेत, असा सोशल मीडियावर व चौकाचौकात मोहिते पाटील समर्थकांनी धुमाकूळ घातलेला होता. रणजितसिंह यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पदाचा एवढा फुगा फुगवला होता. मंत्री पदाची शपथ घेण्याअगोदरच समर्थकांनी संभाव्य खात्याचेही वाटप करण्यात आले होते.

रणजितदादा यांना सहकार, जलसंपदा, कृषी, सार्वजनिक बांधकाम, महसूल यापैकी कॅबिनेट मंत्री पद मिळून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार आहे. सोलापुर जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी मोहिते पाटील यांच्याकडे येणार अशी दिवा स्वप्न समर्थक रंगवून चकाट्या पिटत होते. मात्र एकनाथ शिंदे व देवेंद्रजी फडवणीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर अखेर आ. नदीरणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्रीपदाचा फुगा फुटला असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.

यात्रा, जत्रा व महोत्सवामध्ये लहान मुलांनी फुगा आणावा आणि घरी आल्यावर गाडीतून उतरताना फुटावा, अशी रणजीतसिंह यांची अवस्था झाली असल्याचे विरोधी गोटातून बोलले जात आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पूर्वी मोहिते पाटील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना वेगळी परिस्थिती होती‌. मोहिते पाटील सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये असत, त्या दोन्ही पक्षाची ध्येय धोरणे वेगळी होती.

सध्या भाजपमध्ये असल्याने भाजपची विचारसरणी वेगळी आहे. भाजप पक्षाची ध्येय धोरणे पहिल्यांदा मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांनी समजून घेणे गरजेचे आहे. भाजपमध्ये मागून काहीच मिळत नाही, काम करेल त्यालाच सर्व काही मिळत असते. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे आठ आमदार असताना एकाही आमदाराने किंवा समर्थकांनी इच्छुक म्हणून कोठेही वल्गना केलेली नाही. मोहिते पाटील समर्थक यांनी मंत्री पदाचा पत्ता नाही तोपर्यंत खात्याचे सुद्धा वाटप केलेले होते.

समर्थकांनी काॅंग्रेस व राष्ट्रवादीत नाही तर आपण भाजपमध्ये आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. मोहिते पाटील यांनी समर्थकांना सूचना देणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कितीतरी टर्म निवडून आलेले मनातून इच्छा असते मात्र, प्रकट करीत नाहीत ही भाजपची संस्कृती आहे. मोहिते पाटील यांनी भाजपचे पाच दहा वर्ष पक्ष वाढीचे काम करावे. कामावर पक्ष न मागता मनातील इच्छा पूर्ण करीत असते. मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना वेळीच सुचना देऊन सावध करावे. उगाच विरोधकांना कोलित होऊ नये, अशी निष्ठावान मोहिते पाटील समर्थकांना वाटत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort