Uncategorized

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, फडणवीसांसह भाजप नेते राजभवनात दाखल

मुंबई (बारामती झटका)

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. आज दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. धनंजय मुंडे, आदिती तटकरे, छगन भुजबळ अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात दाखल झाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण ल्हमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मेटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button