Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

…. अन्यथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचा गांधीगिरी मार्गाने पुष्पगुच्छ देऊन पालक सन्मान करणार….

नातेपुते येथे डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेसमोर पुणे-पंढरपूर रोडवर गतिरोधक बसवण्याची प्रकल्प संचालक घोडके यांच्याकडे मागणी…

नातेपुते (बारामती झटका )

नातेपुते येथील पुणे-पंढरपूर रोडवर नातेपुते शहरांमध्ये असणाऱ्या डॉ. बाळकृष्ण दाते प्रशाला येथील शाळेसमोर पुणे-पंढरपूर रोडवर वाहने सावकाश जाण्याकरता गतिरोधक बसविण्याची मागणी प्रकल्प संचालक घोडके यांच्याकडे वारंवार करूनसुद्धा जाणीवपूर्वक डोळेझाक करून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. जर शुक्रवारपर्यंत गतिरोधक केले नाहीत तर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी धर्मपुरी येथे जाण्याअगोदर नातेपुते शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक प्रथम गांधीगिरी पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून प्रकल्प संचालक घोडके यांचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.

डॉ. बाळकृष्ण दाते प्रशाला येथे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नातेपुते व नातेपुते पंचक्रोशीतील आसपासच्या खेडेगावातील विद्यार्थी शाळेसाठी येत आहेत. शाळेचे गेट पुणे-पंढरपूर रोडवर असल्याने शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घराकडे जाण्याची ओढ असते आणि असणे साहजिकच आहे. दिवसभर शाळेमध्ये ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांना अभ्यास व घरातील ग्रामीण भागातील आई-वडिलांना मदत करण्यासाठी, दूध घालण्यासाठी घराकडे लवकर जावे लागते. अशावेळी पुणे-पंढरपूर रोडवर दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत असल्याने अपघात होत असतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होत आहे. भविष्यामध्ये जीवित, वित्तहानी टाळण्याकरता पुणे-पंढरपूर रोडवर दाते प्रशालेसमोर गतिरोधक बसविल्यानंतर अनर्थ टळणार आहे. वारंवार प्रकल्प संचालक यांच्याकडे गतिरोधकची मागणी करूनसुद्धा जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. निषेध म्हणून पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचा सन्मान करण्याचा मनोदय विद्यार्थ्यांच्या पिढीत पालकांमधून येत आहे. यासाठी वरिष्ठांनी लक्ष देऊन दोन दिवसांमध्ये गतिरोधक बसवून घ्यावे, या मागणीने जोर केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

  1. Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further exploration, I recommend visiting: READ MORE. Keen to hear everyone’s opinions!

  2. You actually make it seem really easy along with your presentation but I
    to find this topic to be actually one thing that I believe I’d never understand.
    It kind of feels too complex and very vast for me. I’m looking ahead to your
    subsequent post, I will attempt to get the hold of it!
    Najlepsze escape roomy

  3. Hi there! This article couldn’t be written much better! Looking through this article reminds me of my previous roommate! He always kept talking about this. I’ll forward this article to him. Fairly certain he’ll have a good read. Many thanks for sharing!

  4. I must thank you for the efforts you have put in penning this blog. I’m hoping to view the same high-grade content by you later on as well. In fact, your creative writing abilities has motivated me to get my very own website now 😉

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort